| | Contact: 8407908145 |
    Published On : Sun, May 31st, 2020

    वसंतनगर, काशीनगर परिसर सील

    नागपूर : महापालिकेच्या धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील वसंतनगर रामेश्वरी रोड व हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने धंतोली झोनमधील पार्वतीनगर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

    शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

    वसंतनगर प्रतिबंधित क्षेत्र
    उत्तरपश्चिमेस-प्रमोद उईके यांचे घर
    उत्तरपूर्वेस -जयाबाई गिरडे यांचे घर
    दक्षिणपश्चिमेस -धर्मेंद्र धनविजय यांचे घर
    दक्षिणपूर्वेस-मयूर निकम यांचे घर

    काशीनगर प्रतिबंधित क्षेत्र
    उत्तरपूर्वेस -श्याम बार रेस्टॉरंट
    पूर्वेस – अभयनगर मार्ग (श्याम बार ते अभयनगर उद्यान)
    दक्षिणपूर्वेस -अभयनगर उद्यान
    दक्षिणेस -शताब्दीनगर
    दक्षिणपश्चिमेस -साई किराणा स्टोअर्स
    पश्चिमेस -बेलतरोडी रोड (शताब्दी चौक ते साई किराणा स्टोअर्स)

    पार्वतीनगर येथील कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्र
    दक्षिणपूर्वेस -भोस्कर यांचे घर
    उत्तरपूर्वेस – गिरडे डेकोरेशन
    उत्तरपूर्वेस-वाघमारे किराणा
    दक्षिणपूर्वेस-बैनाबाई गजभिये
    उत्तरपूर्वेस-श्याम मंडप डेकोरेशन
    उत्तरपश्चिमेस -दिनेश ट्रेडर्स
    दक्षिणपश्चिमेस -मौर्य सभागृह
    दक्षिण पूर्वेस -डहाके यांचे घर
    दक्षिणपूर्वेस पंकज निकोसे, वैष्णवी डकोरेशन

    Trending In Nagpur
    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145