Published On : Thu, Jun 11th, 2020

मार्टिननगर, मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी परिसर सील

नागपूर : महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग १ मधील मार्टिननगर, प्रभाग ११ मधील मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २० मधील नाईक तलाव, बैरागीपुरा परिसरात बाधितांची संख्या वाढती असल्याने या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी जारी केले.

प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

मार्टिन नगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरेस -पिंटू किराणा
दक्षिण पूर्वेस – भावना लांजेवार यांचे घर
दक्षिण पश्चिमेस- मायकल फर्निचर
उत्तर पश्चिमेस -मॉरिस सिरील यांचे घर
उत्तर पूर्वेस -गणेश सहारे याचे घर प्रभाग ११ मधील

मानमोडे ले-आऊट प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिण पूर्वेस – सनराईज इमरान यांचे घर
दक्षिण पश्चिमेस -राजेंद्र निठोने यांचे घर
उत्तर पश्चिमेस -रोहन खंडेलवाल यांची इमारत
उत्तर पूर्वेस-शंकरराव राठोड यांचे घर

नाईक तलाव, बैरागीपुरा वाढीव प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पूर्वेस – पार्डीकर यांचे घर
पूर्वेस -नारायण कुंभारे यांचे घर
पूर्वेस -विश्वेश्वर लिखार यांचे घर
पूर्वेस- तावडे यांचे घर
पूर्वेस -गिरमाजी सावजी
दक्षिण पूर्वेस -मनपा गार्डन
दक्षिण पश्चिमेस-केसरवानी यांचे घर
पश्चिमेस-जितेंद्र निनावे यांचे घर
पाश्चिमेस -मोरबा सावजी विहीर
उत्तर पश्चिमेस -देवराव खाटिक यांचे घर