Published On : Tue, Jun 9th, 2020

नारायणपेठ, प्रेमनगर, मॉडेल टाऊन इंदोरा परिसर सील

People been taken for Quarantine in Premnagar, Nagpur

नागपूर : महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २१ मधील नारायणपेठ, प्रेमनगर व आसीनगर झोनमधील प्रभाग ७ मधील मॉडेल टाऊन इंदोरा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. तर गांधीबाग झोनमधील प्रभाग १९ मधील तकिया, दिवानशहा मोमिनपुरा येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्यात आले.

प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

नारायणपेठ, प्रेमनगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपूर्वेस -तुमसरे यांंचे घर
उत्तरपश्चिमेस – ठाकरे यांचे घर
दक्षिणपश्चिमेस- संजय वर्मा यांचे घर
दक्षिणपूर्वेस-नीलेश पानमंदिर

मॉडेल टाऊन इंदोरा प्रतिबंधित क्षेत्र
पश्चिमेस – भाऊराव रंगारी यांचे घर
उत्तरेस -उदय बिल्डिंग, जी.के. चव्हाण यांचे घर
उत्तरपूर्वेस -विकास रंगारी यांचे घर
दक्षिणपूर्वेस-रूपकुमार साखरे यांचे घर

तकिया दिवानशहा मोमीनपुरा कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस -मोतीबाग रेल्वे ब्रीज
उत्तरपूर्वेस -पाचपावली रेल्वे ब्रीज
पूर्वेस -गोळीबार चौक
पूर्वेस -तीन खंबा चौक
दक्षिणपूर्वेस -नालसाहेब चौक
दक्षिणपूर्वेस -गांजाखेत चौक
दक्षिणपूर्वेस -अग्रसेन चौक
दक्षिणेस -गीतांजली चौक
दक्षिणेस-अजंता टी स्टॉल
दक्षिणपश्चिमेस -मेयो कंपाऊंड वॉल
पश्चिमेस-गरीब नवाज मशीद