Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 13th, 2020

  नागपुरात १४ मे पासून हे राहणार सुरू- हे राहणार बंद

  नागपूर : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.

  हे राहणार सुरू

  – केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा‌ वापर

  – एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.

  – दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.

  – आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणं, त्यासाठी लागणारे साहित्य

  – नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था

  – आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन

  – नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)

  – कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल

  – प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.

  – इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)

  – ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)

  – ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)

  – ऑनलाईन मद्यविक्री

  – ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)

  – खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत

  – सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)

  – मान्सूनपूर्व सर्व कामे

  – २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.

  हे राहणार बंद

  – सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)

  – प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)

  – आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)

  – मेट्रो रेल्वे सेवा

  – सर्व शाळा, महाविद्यालाये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)

  – सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी

  – सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम

  – सर्व धार्मिक स्थळे

  – सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा

  – टॅक्सी आणि कॅब सेवा

  – जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा

  – सलून आणि स्पा

  – सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145