नागपूर : होळीच्या उत्सवात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनी सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकणी ४ हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हेगार आणि अवैध दारूविरुद्ध मोठी कारवाई सुरू आहे. यासोबतच, पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना कारवाईत हलगर्जीपणा दाखवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
होळीच्या काळात गुन्हेगार आणि अवैध दारूच्या व्यापाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेआहेत. यापार्श्वभूमीवर शहरातील ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे जिथे पोलिस आणि वाहतूक शाखेचे पथक मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कडक नजर ठेवत आहेत. हे पाहता शहरात होळीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था कडक असेल.
नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारची गुंडगिरी आणि बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. पोलिसांनी नागरिकांना होळीच्या सणानिमित्त आणि शांतता आणि सौहार्द राखावा असे आवाहन केले आहे.