Published On : Wed, May 26th, 2021

तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मोफत सॅनिटाइझर,मास्क वितरित

नागपूर: पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कोरोना जनजागृती अभियानांतर्गत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे केंद्रीय कार्यालय,आनंद नगर,सीताबर्डी,नागपूर येथे मोफत सॅनिटाइझर,मास्क चे वितरण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कोरोना या भयानक महामारीमुळे आज संपूर्ण जगाला मृत्यूने ओढून घेतले आहे.आणि अशा या महामारीत जगाला एकाच गोष्टीची आठवण करून देते ती म्हणजे भगवान बुद्धांची आज संपूर्ण जग हे बुद्ध च्या तत्वज्ञान वर चालत आहे असे प्रतिपादन कवाडे यांनी यावेळी केले .याप्रसंगी महाराष्ट्र व देशाला कोरोनामुक्त होऊ दे अशी सामूहिक प्रार्थना(मंगलमैत्री) करण्यात आली
या कार्यक्रमाला प्रामुख्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, ओ.बी.सी सेल चे नागपूर शहर अध्यक्ष विपीन गाडगिलवार,दलित मुक्ती सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष अजय चव्हाण,महासचिव बापू भोगाडे,स्वप्नील महल्ले,पियुष हलमारे,कुशीनारा सोमकुवर,नीरज पराडकर,गौरव गोयंका, नरेंद्र ढवळे,महिंद्र मेश्राम, संजय ढोबळे,अखिल तिरपुडे,सुरज मेश्राम, लक्ष्मीकांत खरे,उत्तम हुमणे, निशांत मंचलवार,महिंद्र पावडे,आदित्य सुखदेवे आदी उपस्थित होते