Published On : Sat, Feb 10th, 2024

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी तेवढी त्यांची पात्रता नाही ;चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

Advertisement

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर भाष्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी तेवढी त्यांची उंची आणि पात्रता नाही. गेल्या काही दिवसांत त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून त्यांच्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागली आहे. त्यांची सध्या झालेली ही अवस्था ती त्यांनी स्वतःच्या हाताने करवून घेतली आहे. ‘असंगाशी संग’ केल्यानंतर असेच होणार,अशी शब्दात बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.

Advertisement

राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असल्यामुळे सभ्यता राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या खालच्या भाषेत टीका करत आहे ती पातळी आम्हाला गाठता येणार नाही. कारण आम्ही सभ्यता आणि संस्कृती पाळणारे आहे. पण त्यांची भाषा, टोमणे यातून त्यांना नैराश्य आले आहे. या बिकट मनोवस्थेतून त्यांनी लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना आम्ही करू शकतो, असे बावनकुळे म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement