Published On : Mon, Jun 4th, 2018

उज्ज्वल निकम यांच्या गाडीला अपघात

पुणे : पुण्याहून मुंबईला येताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या गाडीला अपघाता झाला आहे. सुदैवाने उज्ज्वल निकम यांना या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना बोरघाटात हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या गाडीतून ते मुंबईला रवाना झाले. आपल्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

अपघात नेमका कसा झाला आणि यामध्ये कुणाची चूक होती, याबाबत अद्याप काहीही समजू शकलेलं नाही. निकम ज्या गाडीने प्रवास करत होते, ती त्यांची सरकारी गाडी होती, ज्यावर पुढे भारत सरकार असं लिहिलेलं आहे.