Published On : Fri, Jun 5th, 2020

आजपासून नागपुरातील बाजारांमध्ये उत्साह परतणार

नागपूर : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला तीन टप्प्यात सवलती देण्याचा आदेश जारी केला. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या या सवलतींचा दुसरा टप्पा आज शुक्रवारी सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ऑड तारखेमुळे नागपूर शहरात उत्तर ते पूर्व आणि दक्षिण ते पूर्व दिशेने शटर असलेली दुकाने उघडता येतील.

उल्लेखनीय असे की, मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता आयुक्तांनी आपल्या आदेशात उर्वरित सर्व दुकाने उघडण्याला परवानगी दिली आहे. एक दिवस रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील. अशा ऑड व ईव्हन तारखेबरोबर शहरात ही नवीन व्यवस्था केली आहे.

आॅड तारखेला उत्तरेकडून पूर्व व दक्षिण ते पूर्व दिशेने शटर असलेली दुकाने आणि ईव्हन तारखेला उत्तर ते पश्चिम आणि दक्षिण ते पश्चिम दिशेला शटर असलेली दुकाने उघडतील. शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही. कोविड -१९ चा रुग्ण आढळून आल्यानंतर मनपा आयुक्तांनी प्रतिबंध क्षेत्र घोषित केलेल्या भागात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर सेवा बंद राहतील.

असे असतील नियम
मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा व दुकाने सकाळी ९ संध्याकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. ऑड-ईव्हन व्यवस्थेअंतर्गत पहिल्या दिवशी बाजारात दुकानांची एक लाईन व दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील. ऑड तारखेला उत्तर ते पूर्व व दक्षिण ते पूर्व आणि ईव्हन तारखेला उत्तर ते पश्चिम व दक्षिण ते पश्चिमेकडे शटर असलेली दुकाने उघडतील.

कोणत्याही आस्थापना किंवा दुकान मालकास दुकानाच्या दिशेसंदर्भात संभ्रम असल्यास ते झोनच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधू शकतात. कपड्यांच्या दुकानात ट्रायल कक्ष बंद असतील. तयार कपड्यांच्या कोणत्याही परताव्याची किंवा बदलीची परवानगी नाही.

बाजारातील सुरक्षित अंतर पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची राहील. दुकानदारांना होम डिलिव्हरी, टोकन सिस्टिम आणि मार्किंगच्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलचा वापर करून वाहन वापरणे टाळा. नियमांकडे कुठेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्यास, दुकान किंवा बाजार बंद करण्याचा मनपाला पूर्ण अधिकार राहील. टॅक्सी-कॅब, ई-रिक्षा, चारचाकी वाहनांसाठी वन प्लस टू फॉर्म्युला अस्तित्वात येईल, तर दुचाकीवरून एकालाच प्रवास करता येईल.

नागपूर शहर हद्दीत हे बंद राहतील
शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास आंतरराष्ट्रीय विमान सेवा (विशेष बाबतीत गृह मंत्रालयाच्या परवानगी वगळता) मेट्रो रेल, विशेष परवानगी गाड्या आणि घरगुती विमान वगळता सामान्य सेवा सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, इन्डोर स्टेडियम शॉपिंग मॉल, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, सभागृह सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना, एकत्रित पुजापाठ हेयर कटिंग सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर तत्सम कार्यक्रम

याचे पालन आवश्यक करावे लागेल
सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्क अनिवार्य सुरक्षित अंतर पाळलेच पाहिजे विवाह सोहळ्यात ५० हून अधिक लोकांना आणि अंत्यसंस्कारात २० हून अधिक लोकांना परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा सार्वजनिक ठिकाणी दारू, मद्यपान, तंबाखूचे सेवन करण्यास मनाई आहे कामावर नियमित स्वच्छता करणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे

आजपासून सुरू होणार सराफा बाजार
प्रशासनाच्या नवीन नियमानुसार सम-विषम (इव्हन-आॅड) पद्धतीने शहरातील सराफा व्यापाऱ्यांची दुकाने ५ जूनपासून सुरू होणार
असल्याची माहिती नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी दिली.
नियमानुसार पूर्व आणि उत्तर मुखी शटर/गेट असलेली दुकाने विषम अर्थात १, ३, ५, ७, ९ अशा तारखांना आणि पश्चिम मुखी शटर/गेट असलेली
दुकाने सम अर्थात ०, २, ४, ६, ८, १० अशा तारखांना खुली राहणार आहेत. सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत राहील.
ग्राहकांनी या नियमांचे पालन करून या वेळेत खरेदी करावी.
६५ वर्षांवरील व्यक्ती, १० वर्षांखालील मुले आणि गर्भवती महिलांना प्रवेश मिळणार नाही. त्यांनी घरीच राहावे.
प्रशासनाचे दिशानिर्देश आणि वेळ ३० जूनपर्यंत राहणार आहे. पुढे नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे रोकडे यांनी सांगितले.