नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून एका ढाब्यावर वेटरचे काम करणाऱ्या ५० वर्षाच्या वेटरला भरधाव टिप्परने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.रामु (५०) असे मृत्यू झालेल्या वेटरचे नाव असून तो मुका आहे. तर गणेश उर्फ बादल महादेव उके (२४, रा. गोवरी ता. मौदा, जि. नागपूर) असे आरोपी टिप्पर चालकाचे नाव आहे
माहितीनुसार, ही घटना सोमवारी २७ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पारडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली असून पोलिसांनी आरोपी टिप्पर चालकास अटक केली आहे.
भंडाऱ्याकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक एम. एच. ४०, बी. एल-९६८८ चा चालक गणेशने आपल्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने चालवून रामुला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषिक केले. या प्रकरणी रोशन गजभिये यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी टिप्पर चालक गणेश उकेला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.
नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident...
जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion...
अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews
स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...
घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...
अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana #MaharashtraNews



