Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Wed, May 22nd, 2019
maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

जेव्हा कामठी पोलीस स्टेशन मधुन आरोपी पसार होतो तेव्हा..

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन चा कारभार नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात 14 मे 2016 ला समाविष्ट करण्यात करण्यात आले असून या पोलीस स्टेशन च्या कारभाराचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते यावेळी शहरात कायद्याचे राज्य निर्माण होणार अशी वलग्ना करण्यात आली होती परंतु या नवीन कामठी पोलीस स्टेशन चा विचार केला असता या पोलीस स्टेशन मध्ये काही वर्षांपूर्वी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रार संदर्भात असमाधानि असलेल्या व न्यू खलाशी लाईन येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय फिर्यादी इसमाणे त्रस्त होऊन पोलीस स्टेशन समोर च स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केल्याची घटना घडली होती तसेच त्यानंतर लिहिगावच्या सुजल वासनिक नावाच्या अल्पवयीन आरोपीच्या अपहरण प्रकरणातील लिहिगाव येथील अटक आरोपी ने कामठी पोलीस स्टेशन च्या बंदीगृहात स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता सुदैवाने ही जीवितहानी टळली असली तरी यासारख्या घडलेल्या घटनेचा विसर पडत नाही तोच येथील अब्दुल्लाहशाह दरगाह परिसरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या भांडणातून लोखंडी चाकूने केलेल्या हल्ल्यात काल 21 मे ला सायंकाळी साडे सात दरम्यान प्रतिबंधीत असलेल्या आरोपीने कामठी पोलीस स्टेशन मधून पळ काढल्याची घटना घडली असल्याने हे पोलीस स्टेशन अजून एकदा चर्चेत आले आहे तर पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या आरोपी चे नाव शेख महबूब शेख मेनू वय 25 वर्षे रा बाबा अब्दुल्लाह शहा दर्गा मागे कामठी असे आहे. तर आरोपिकडून एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून आरोपीला प्रतिबंधीत ठेवण्यात आले मात्र आरोपीला लॉकअप करण्यात आले नव्हते हे इथं विशेष ! आरोपी दुपारी 1 वाजेपासून ते सायंकाळी साडे सात ।वाजेपर्यंत प्रतिबंधित स्थितीत पोलिसांच्या सुरक्षिततेत राहला मात्र आरोपिला अटक करण्याची कारवाही करण्यात आली नसल्याने त्याला लॉक अप करण्यात आले नव्हते परिणामी आरोपिणे पोलीस स्टेशन चा अकस्मात विद्दूत पुरवठा खंडीत झाल्याची संधी साधताच पोलिस स्टेशन मधून पळ काढण्यात यश गाठल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणात पोलीस निरीक्षकाचे अनियंत्रण दिसून येते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागिल सात आठ महिन्यांपूर्वी दारू पिण्याच्या वादावरून दोन इसमात वाद घडला होता या वादाची मध्यस्थी करून समझोता करण्यात आला होता मात्र या वादाची आज 21मे ला दुपारी साडे बारा दरम्यान पुनःश्च झालेल्या पुनरावृत्तीतून पसार आरोपी शेख म्हबूब शेख मेनू ने फिर्यादी विशाल चरनदास धुर्वे वय 26 वर्षे रा चित्तरंजन दास नगर कामठी ला चाकूच्या वाराने जख्मि केले होते यावरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंद करीत ताब्यात घेतले होते मात्र जेरबंद करण्यात आले नव्हते तर हा फक्त प्रतीबंधीत होता जख्मि फिर्यादी चे वैद्यकीय तापसनावरून आरोपीला अटक करण्यात येणार होते यानुसार फिर्यादी जख्मि ला नागपूर च्या शासकीय रुग्णालयात उपचार करून कामठी ला परत आल्यावरच गुन्हा दाखल होणार होता मात्र सायंकाळी साडे सात दरम्यान अकस्मात झालेल्या अवकाळी पावसातुन झालेल्या भारनियमातून खंडित झालेल्या विद्दूत पुरवठा ची संधी साधून बंदीगृहाच्या बाजूला बसलेल्या व प्रतिबंधीत कारवाहिस्तव असलेल्या आरोपी शेख मेहबूब शेख मेनू ने संधी साधून कामठी पोलीस स्टेशन मधून पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्यात यश गाठल्याने पोलीस स्टेशन ला एकच चर्चेचा विषय ठरला होता मात्र या घटनेने नेहमीप्रमाणे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत चर्चेचा विषय ठरलेल्या या पोलीस स्टेशन ला आरोपी पसार च्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ माजली. तसेच आज 24 तास लोटूनही आरोपीला अटक करण्यात आले नाही हे इथं विशेष…तर या प्रकरणात आरोपीला सुचनापत्र देण्यात आल्याचा बतावणी करून झालेल्या भोंगळ कारभाराला लगाम लावण्याचा प्रकार सुरू आहे…मात्र भादवी कलम 324 प्रकरणात बहुधा आरोपीला अटक करून जामिनावर सोडण्यात येते मात्र या प्रकरणात पोलिसांनी या आरोपीला सुचनापत्र दिल्याची बतावणी करीत असल्याने पोलिसांचे आरोपी सोबत सुमधुर संबंध तर नाही ना याही चर्चेला उत येत आहे.

पोलीस निरीक्षक बापू ढेरे:-या घटनेत आरोपीला अटक करण्याची नोंद नसून भादवी कलम 324 प्रकरणात आरोपीला सुचनापत्र देण्यात आल्याचे माहिती दिली.

– संदीप कांबळे, कामठी

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145