Published On : Tue, Aug 31st, 2021
By Nagpur Today Nagpur News

‘कन्हान-१३००’ मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी २४-तासांचे शटडाऊन 2 सप्टे.ला

Advertisement

लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर आणि आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र वरून शहराकडे येणाऱ्या १३०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर उद्भवलेल्या, साई मंदिरच्या मागे, पिली नदी येथील मोठी गळतीची दुरुस्ती करण्यासाठी तसेच सक्करदरा टाकी वर काही तांत्रिक काम आणि बाबुलवन टाकीवर फ्लोमीटर ची जोडणी करणे ह्या करिता २४ तासांचे शटडाऊन- सप्टेबर २ (गुरुवार) सकाळी १० ते सप्टेबर ३ (शुक्रवार ) २०२१ सकाळी १० दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.

काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे हे शटडाऊन १ सप्टेबर (बुधवार) ऐवजी सप्टेबर २ (गुरुवार) ला घेण्यात येणार आहे.

या कामांमुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा सप्टेबर २ (गुरुवार ) सकाळी १० ते सप्टेबर ३ (शुक्रवार ) २०२१ संध्याकाळी ५ दरम्यान संपूर्णपणे बाधित राहणार आहे. तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर सप्टेबर ३ (शुक्रवार ) २०२१ रोजी संध्याकाळी ५ नंतर संध्याकाळचा पाणी पुरवठा असलेल्या भागांना कमी दाबाने आणि त्यानंतर पुढील ४८ तास कमी दाबाने होणार आहे, नागरिकांनी ह्याची नोंद घ्यावी .

Advertisement

विनाकारण वाया जाणारे पिण्याचे पाणी वाचविण्याच्या दृष्टीने, १३०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर, साई मंदिर च्या मागे , पिली नदी येथील उद्भवलेली हि मोठी गळती दुरुस्त करणे तसेच सक्करदरा टाकी वर तांत्रिक काम आणि बाबुलवन टाकीवर फ्लोमीटर ची जोडणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

ह्या शटडाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

या २४ तासांचे शटडाऊन- कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग

सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ

यादरम्यान जवळपास लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.