Published On : Fri, Aug 3rd, 2018

‘व्हाईस ऑफ विदर्भ’ची अंतिम फेरी आज

Advertisement

नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि लकी म्यूझिकल इवेंट्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्हाइस ऑफ विदर्भ’ची अंतिम फेरी उद्या शनिवारी (ता. ४) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘मेगा फायनल’मध्ये उपांत्य फेरीतून निवड झालेले दोन्ही गटातील एकूण २३ स्पर्धक विजेतेपदाचा मुकुट पटकाविण्यासाठी आव्‍हान देणार आहेत.

१४ वर्षाखालील व १४ वर्षावरील अशा दोन गटात स्पर्धेची प्राथमिक व उपांत्य फेरी घेण्यात आली होती. प्राथमिक गटातून १२७ स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीत १४ वर्षावरील गटातून १३ स्पर्धकांची तर १४ वर्षाखालील गटातून १० अशा एकूण २३ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, हर्षल हिवरखेडकर, लकी म्यूझिकल इवेंट्सचे लकी खान आदी सहकार्य करीत आहेत.

Advertisement
Advertisement

अंतिम फेरीसाठी पात्र स्पर्धक

१४ वर्षावरील गट : प्राची वैद्य, स्वास्तिका ठाकूर, उजमा शेख, श्रीकांत टकले, वैष्णवी निम्बुलकर, गौरव हजारे, पौर्णिमा, श्रेया मेंढे, विजय खडसे, प्रज्योत देशमुख, स्नेहल चव्हाण, शशांक मोरेकर, जगदीश डोंगरे.

१४ वर्षाखालील गट : ज्ञाननंदा भोंडे, सुमिधा बालपांडे, आयुष मानकर, सिया जेम्स, स्वप्नमय चौधरी, मिताली कोहड, विश पारलकर, सानवी पाठक, श्रावणी खंडाले, मुकुंद कुथे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement