Published On : Thu, Feb 15th, 2018

महाशिवरात्री निमित्त उपमहापौरांनी घेतले शंकराचे दर्शन

Advertisement

नागपूर: महाशिवरात्री निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी मोक्षधाम घाटावरील अर्धनारीनटेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधीवत पुजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले प्रामुख्याने उपस्थित होते.

उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी प्रतिमेची पुजा करून मोक्षधाम घाटाची पाहणी केली. नागरिकांच्या आणि तेथील कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेतल्या. व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले.

यावेळी झोनचे सहायक आयुक्त स्मीता काळे, आरोग्य विभागाचे विभागीय अधिकारी राजेश गायकवाड, शंकर टेकाम, राजेश वासनिक आदी उपस्थित होते.