Published On : Thu, Dec 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ; नागपुरातील खामल्यात क्रेडिट कार्ड घोटाळा उघड; स्थानिक रहिवाश्यांची 11 कोटी रुपयांनी फसवणूक !

Advertisement

नागपूर : शहरातील खामला परिसरात 150 रहिवाशांची फसवणूक करत 11 कोटी रुपयांचा क्रेडिट कार्ड घोटाळा उघडकीस आला आहे. पीडितांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या मित्राचा या घोटाळ्यात हात असल्याची माहिती समोर आली आहे. ‘नागपूर टुडे’ने या पीडित नागरिकांशी संवाद साधत या प्रकरणावर प्रकाश टाकला.

आरोपींने हुशारीने परिसरातील नागरिकांना विश्वासात घेत त्यांची फसवणूक केली. 2022 पासून सुरू झालेला हा घोटाळा अनेक महिन्यांपर्यंत कुणाच्याही लक्षात आला नाही. अखेर येथील नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.प्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितांना विश्वासात घेऊन गुन्हेगारांनी त्यांचे क्रेडिट कार्ड तपशील शेअर करण्यास पटवून दिले.

कालांतराने, फसव्या व्यवहारांसाठी या तपशीलांचा गैरवापर केला गेला. आरोपींपैकी एक जण पीडितांच्याच परिसरात राहत होत. त्यांच्या जवळचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन त्याने वारंवार पीडितांना लुटले.

Advertisement

या प्रकरणात टर्निंग पॉइंट आला जेव्हा एका कथित मास्टरमाइंडने व्हिडिओवर गुन्ह्याची कबुली दिली. घोटाळा कसा अंमलात आणला गेला याची माहितीही त्याने सांगितली. याबाबत इतके ठोस पुरावे असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पीडित, ज्यांपैकी अनेक मध्यमवर्गीय व्यक्ती आहेत ज्यांनी लाखो रुपये या घोटाळ्यात गमावले आहे.

पोलिसांकडे वारंवार निवेदने देऊनही त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पिडीतांनी केला. आम्ही पोलिसांना आरोपींचे व्हिडिओ कबुलीजबाबासह सर्व पुरावे दिले आहेत, तरीही गुन्हेगार मोकळे फिरत आहे, असे एका पीडित रहिवाशाचे म्हणणे आहे.

फसव्या व्यवहारांमुळे अनेकांनी आपली बचत गमावली आहे किंवा ते आता कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत.आम्ही आमच्या शेजाऱ्यावर विश्वास ठेवला. मात्र आमचा विश्वासघात झाल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. या घोटाळ्याने बँकिंग व्यवस्थेतील असुरक्षितता आणि क्रेडिट कार्ड तपशील सुरक्षितपणे हाताळण्याबाबत लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव देखील उघड केला.

खामला येथील रहिवासी याप्रकरणी त्वरीत कारवाईची मागणी करत आहेत. तर यातील पीडित महिला या प्रकरणी जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्याचा विचार करत आहेत.

सायबर क्राइम तज्ज्ञांचा सल्ला-
• क्रेडिट कार्ड माहिती कधीही शेअर करू नका, अगदी ओळखीच्या व्यक्तींसोबतही.

• संशयास्पद व्यवहारांसाठी स्टेटमेंट नियमितपणे तपासा.

• अनधिकृत क्रियाकलापांची बँकांना त्वरित तक्रार करा.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.