Published On : Tue, Jun 22nd, 2021

२३ जूनपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार सुरू

Advertisement

१०६ केंद्र : ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने करता येईल नोंदणी


नागपूर : राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार १८ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बुधवार (२३ जून) पासून नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या १०६ केन्द्रावर सुरु होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत लसीकरण केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्र मिळून १०६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. यातील कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असलेल्या १०६ केंद्रांवरून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

Advertisement

केन्द्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोज दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.