Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला उद्धव ठाकरेंनी दर्शविली असहमती; देवेंद्र फडणवीसांनी सुनावले खडेबोल

नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयकाचा आढावा घेणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने बुधवारी या मसुद्याला मंजुरी दिली. जेपीसीच्या या निर्णयावर विरोधकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विधेयकाला असहमती दर्शविली. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सातत्याने लांगूलचालनाची भूमिका घेतलेली आहे. केवळ एका समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा होती. ती अल्पसंख्याक लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंच्या सेनेने अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे. कारण वक्फ बोर्डाचे बिल हे कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुस्लिम समाजाच्या तर विरोधात बिलकुल नाही. या ठिकाणी वक्फच्या माध्यमातून जो गैरकारभार आणि गैरव्यवहार चाललेला आहे तो संपला पाहिजे म्हणून हे विधेयक आणलेलं आहे. अशावेळी फक्त मतांच्या लाचारी करता याचा विरोध ते करत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रातील जनता हे पाहते आहे. कशाप्रकारे ते लांगूलचालन करत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले, असे फडणवीस म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement