Published On : Tue, May 18th, 2021

मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १८ मे) रोजी २८ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,२५,००० चा दंड वसूल केला.

पथकाने तीन झोनमध्ये ९ दुकाने सील करण्याची कारवाई केली. गांधीबाग झोन अंतर्गत प्रेसीडेंट वाईन शॉप, किला रोड, कमाल रेडीमेड, मोमिनपुरा, पिंटु सावजी जुनी मंगलवारी आणि भव्य साडी, नंगापुतला चौक यांना गांधीबाग झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सतरंजीपूरा झोन अंतर्गत शहीद चौक इतवारी मधील जैन होजेरी स्टोअर्स, चंदन गारमेन्ट व वामन थ्रेडस फॅक्टरी शांतीनगर तसेच मंगळवारी झोन मधील पुनम चेंबर छावणी येथील मॅक डोनल्ड रेस्टॉरेन्ट आणि अंजुमन कॉम्प्लेक्स सदर येथील बेल्जीयम वाफले दुकानाला मंगळवारी झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.