Published On : Mon, Aug 2nd, 2021
By Nagpur Today Nagpur News

नासुप्रनी विकसीत केलेले गाळे मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या वसतिगृहासाठी उपयुक्त-पालकमंत्री

Advertisement

खरेदीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवण्याचे निर्देश

नागपूर : वाठोडा येथील नागपूर सुधार प्रन्यासचे घरकुल योजनेतील गाळे मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या वसतीगृहासाठी खरेदी करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांना दिले. गाळे खरेदीच्या प्रस्तावाला त्यांनी तत्वत: मंजुरी दिली.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वाठोडा येथील या गाळ्यांना त्यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये व समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण 25 वसतिगृह कार्यरत आहेत. त्यापैकी 16 भाडयाच्या इमारतीत आहेत. या 16 पैकी 7 मुलांचे तर 9 मुलींचे वसतीगृह आहेत. मुलांसाठी स्वाधार योजना व भाडेपोटी घेतलेल्या इमारतींचा खर्च 8.49 कोटी प्रतिवर्ष असल्याची माहिती श्री. गायकवाड यांनी दिली.

Advertisement

तर मुलीसाठी हाच खर्च 7.51 कोटी प्रतिवर्ष असा आहे. भविष्यात संभावित विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता भाडे खर्च वाढता असु शकतो. त्यामुळे मागासवर्गीय मुला मुलींच्या वसतीगृहासाठी नासुप्रनी विकसीत केलेले गाळे उपयुक्त असून शासनाचा वसतीगृह भाड्याकरीता होणारा खर्च वाचणार आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाकडे दिर्घकाळाकरीता सुविधायुक्त वास्तु उपलब्ध होईल.


448 गाळ्याच्या या सुसज्ज वास्तुमध्ये 2352 मुलांच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकते अशी माहिती श्रीमती लीना उपाध्ये यांनी दिली. तसेच गृहपाल निवास कक्ष, ग्रंथालय, वाचनालय, सुरक्षा रक्षक कक्षासाठी सुध्दा जागा उपलब्ध आहे. सौर उर्जेचाही वापर केला आहे. स्वतंत्र मलजल प्रक्रीया व विद्युत उपकेंद्र असलेली ही इमारत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे पालकमंत्री म्हणाले. लवकरात लवकर या इमारत खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना त्यांनी केली.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews #nagpur #nagpurnews #crimenews

बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी गिरफ्तार

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha #nagpurnews

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday #news

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...

वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra

वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges