Published On : Mon, May 23rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.23) रोजी 02 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली.

गांधीबाग झोन अंतर्गत क्वेटा कॉलनी येथील रुबीना प्लास्टिक आणि टेलिफोन एक्सचेंज चौक येथील गोपाल प्लास्टिक या दुकानांविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.