Published On : Fri, Mar 20th, 2020

Video: ‘ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक’, नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

Advertisement

नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे (Tukaram Mundhe on Nagpur lockdown). यानुसार नागपूर शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा आणि उद्योग बंद करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे आता नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांच्या या शिस्तीचा नागरिकांना अनुभव येणार आहे. एपिडमिक अॅक्टच्या नियम 10 नुसार मुंढे यांनी हा निर्णय घेतला आहे. यानुसार नागरिकांना केवळ आवश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, अशा सक्त सुचना देण्यात आल्या.

Gold Rate
May 02- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,800 /-
Gold 22 KT ₹ 1,40,200 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पिण्याचे पाणी, सिव्हेज सर्व्हिस, फोन, दूध, भाजी, किराणा अशा काही मोजक्या गोष्टींना या लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट देण्यात आली आहे. रेस्टॉरन्ट आणि हॉटेल्सवरही निर्बंध लादण्यात आले असले, तरी या ठिकाणी होम डिलिव्हरी करण्यास मुभा देण्यात आली आहे. ई कॉमर्स डिलिव्हरी, मीडिया, आय टीमधील अत्यावश्यक सेवा यांनाही काही प्रमाणात सूट असणार आहे.

लॉकडाऊनची घोषणा करताना तुकाराम मुंढे यांनी नागरिकांनी पॅनिक न होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी मॉर्निंग वॉकलाही घराबाहेर पडू नये, अशा सुचना दिल्या आहेत. अत्यावश्यक ठिकाणी बस सेवाही सुरु ठेवण्यात येणार आहेत. हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील. त्यानंतर आवश्यकतेनुसार याची मुदत वाढवण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement