Published On : Fri, Aug 5th, 2022

शितला माता मंदिर कांद्री कन्हान द्वारे कु. राघव चौकसे चा सत्कार

कन्हान : – एडिफाई शाळेचा विद्यार्थी कु.राघव संजय चौकसे ह्याने दहावीच्या सीबीएससी बोर्ड च्या परिक्षा मध्ये ९२.४० % टक्के गुण घेत प्राविण्य प्राप्त केल्याने शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट द्वारे कु. राघव चौकसे ह्याचा पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट चे सदस्य व चौकसे ट्रांसपोर्ट चे संचालक संजय चौकसे हयाचा मुलगा कु राघव संजय चौकसे याने एडिफाई शाळेत दहावी सी बीएससी बोर्ड च्या परिक्षेत ९२.४० % टक्के गुण प्राप्त करून प्राविण्य मिळविल्याने शितला माता मंदिर ट्रस्ट कांद्री-कन्हान द्वारे कु.राघव चौकसे ला मान्यवरांच्या हस्ते पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पिंटु सिंग, गीतु सिंग, वामन देशमुख, पप्पी भाई, प्रकाश ढोके, वसंता राऊत, प्रकाश हटवाया, पारस मरघटे, अशोक खैरकर, महेश मंगतानी, प्रितेश मेश्राम, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हान सह नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement