Published On : Mon, Mar 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

शिंदे गटाची कल्याणमध्ये ताकद वाढली;ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश

Advertisement

कल्याण: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व नेते आपल्या पक्षाची ताकद वाढण्यासाठी तयारीला लागले आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते शिंदे गटात प्रवेश करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले होते.त्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत कल्याणमध्ये गेले. परंतु उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झाला नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्याण येथील पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी शनिवारी १६ मार्च रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. कल्याण लोकसभा मतदार संघावर शिंदे गटाचे वर्चस्व होते.

परंतु आता उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे.तर या पक्षप्रवेशाने शिंदे गटाचे पारडे मजबूत झाले. या सोहळ्याला कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगरमधील पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.