Published On : Sat, Feb 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

शरद पवारांनी केला डोलीतून गड सर; रायगडावर ‘तुतारी’चा नाद घुमला,पक्षचिन्हाचे अनावरण !

Advertisement

रायगड : केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह बहाल केले. यापार्श्वभूमीवर आज ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाकडुन रायगडवर तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचे स्वागत केले या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचे रणशिंग फुंकले. शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर आपल्या पक्षाच्या नवीन चिन्ह अनावराच्या निमित्ताने रायगडावर आले होते. यावेळी त्यांनी डोलीतून गड सर केला.

दरम्यान पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. त्यानंतर पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.