Published On : Wed, Nov 24th, 2021

सेक्सटॉर्शन माफिया’च्या रडारवर नेते मंडळी : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

सहज जाळ्यात अडकणे शक्य अत्याधुनिक यंत्रणेसह टोळ्या सक्रिय.

नागपूर: समाजातील प्रत्येक घटकाची कामे करून देण्याची तयारी ठेवणे तसेच वेळी अवेळी त्यांच्याशी फोनवर संवाद साधने आता नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सोशल मिडियातील तज्ज्ञ गुन्हेगारांकडून नेत्यांशी सहज संपर्क करून, त्यांच्याशी जवळीक वाढवून त्यांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकविणाचे अनेक प्रकरणे पुढे येत आहे. त्यामुळे सहज उपलब्ध असलेले नेते, आमदार सायबर गुन्हेगारांचे ‘टार्गेट’ ठरण्याची शक्यता बळावली आहे.

मुंबईतील एक शिवसेना आमदार सेक्सटॅार्शनच्या जाळ्यात अडकले असून याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केली. समाजातील सहज वावर, कुणाचीही कामे करून देण्याची वृत्तीमुळे नेते, आमदार, नगरसेवकांवर सहज सायबर गुन्हेगारांकडून जाळे टाकणे सहज शक्य असल्याचे सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक अजित पारसे यांनी नमुद केले. सायबर गुन्हेगारांकडे प्रशिक्षित अशी टिम कार्यरत असून अद्ययावत यंत्रणेचाही वापर केला जातो. यात नेत्यांशी एखाद्या कामानिमित्त भेटण्यासाठी टिममधील सदस्य वेगवेगळ्या नावाने भेटून जवळीक वाढवतात. मग फ्रेन्ड रिक्वेस्ट आदी पाठवून सोशल मिडियावर मैत्री केली जाते. नेत्यांना फालोअर्सची गरज असल्याने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविणारा कोण आहे? काय करतो? याची माहिती न घेताच रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात अन् येथेच सायबर गुन्हेगाराच्या यशाची बिजे रोवली जाते, असे पारसे यांनी सांगितले.

त्यानंतर सातत्याने व्हॉट्‍सॲपवर संवाद, व्हीडीओ कॉलिंग हा प्रकार सुरू होत असून केवळ सात दिवसांत सायबर गुन्हेगाराच्या टोळ्या एखाद्याला सेक्सटॉर्शनमध्ये ओढून ब्लॅक मेल करणे सुरू करू शकतात.

निवडणूकीच्या काळात राजकीय प्रतिस्पर्धीला कायमचे संपविण्यासाठी असे प्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. राजकीय कारकिर्द संपुष्टात आणण्यासाठी अशा प्रकारची ‘सुपारी’ही दिली जाण्याचे प्रकार भविष्यात पुढे येऊ शकतो. पुरुष गुन्हेगारच बरेचदा व्हाईस मॉड्यूलर सॉफ्टवेयर वापरून महिलांच्या आवाजात ऑडिओ कॉलवर संभाषण करतात, हेही आमदारांच्या प्रकरणावरून पुढे आले. लैंगिक मुद्यांवर व्हिडीओ कॉलवर बोलणे सुरू करत थेट आभासी शारिरिक समाधानासाठी तयार केले जाते. विविध अनधिकृत व्हिडीओ रेकॉर्ड अप्लिकेशन, दुसरा मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रिन रिकॉर्डिंग अप्लिकेशनचा वापर करून ते रेकॉर्ड केले जाते. त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना फेक आयडी तर नाही ना? याबाबत सावध होण्याची गरज त्यांंनी व्यक्त केली.

नेत्यांचा समाजात सहज वावर असतो. अनोळखी नागरिकही कामानिमित्त त्यांना भेटायला येतात. त्यामुळे ते सहज फोनवर, चॅटिंगवर उपलब्ध होतात. त्यामुळे आता नेते मंडळींकडे सायबर गुन्हेगारांनी मोर्चा वळविला. राजकीय स्पर्धेतूही असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे नेत्यांंनी अनोळखी नागरिकांशी संवाद करणे किंवा त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना संबंधिताची पूर्ण माहिती घेणे आवश्यक झाले आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.ajeetparse.com