Published On : Tue, Mar 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज होणार घोषित; महाराष्ट्राच्या २५ जागांसाठी नावे होणार जाहीर!

नवी दिल्ली-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच पहिली यादी जाहीर केली. आज पक्षाच्या वतीने दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा या राज्यांमधील जागांवर चर्चा करण्यात आली. १३ मार्चनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात भाजपासह काँग्रेस, तृणमूल काँग्रेसनेही उमेदवार यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या बैठकीत १०० जागांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपा लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्रातील २५ जागांबाबत भाजपाच्या बैठकीत चर्चा झाली असून ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. यात नितीन गडकरींना नागपूर, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, जालना रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement