Published On : Wed, Mar 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर SBI कडून निवडणूक रोख्यांची माहिती सादर

Advertisement

नवी दिल्ली :सर्वोच न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर एसबीआयने निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. ही माहिती लवकरच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय स्टेट बँकेला दिलेल्या निर्देशांचे पालन करून, भारतीय स्टेट बँकने निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती आज १२ मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. असं निवडणूक आयोगाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. ही योजना घटनाविरोधी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. तसेच २०१९ पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने एसबीआयला दिले होते. यासाठी न्यायालयाने ६ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर एसबीआयनं ही मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

मात्र, हा अर्ज फेटाळत न्यायालयाने एसबीआयला चांगलेच फटकारले. तसेच १२ मार्च रोजी सायंकाळी ५ पर्यंत ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार एसबीआयने निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.