Published On : Thu, Oct 1st, 2020

राजू बहादूरे यांच्या अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी : ॲड.धर्मपाल मेश्राम

रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते व मनपा चे माजी विरोधी पक्ष नेते राजू बहादूरे कोरोनामुळे निवर्तले ही बातमी मिळाली. माझ्यासाठी व परिवारासाठी अत्यंत दु:खद बातमी आहे.

ते माझे मोठे बंधू होते. नागपूर महानगरपालिकेचे ते दोनदा नगरसेवक राहिले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे ते नागपूर शहराध्यक्षही राहिलेले आहेत.

त्यांच्यासोबत मला राजकारण आणि समाजकारणात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अकाली जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.

उभारीच्या काळात त्यांच्यासोबत कार्य करणारे मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते दु:खी झालेले आहेत. त्यांच्याप्रती मी नागपूर महानगरपालिका आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने शोक संवेदना व्यक्त करीत आहे.

कोरोना माहामारीच्या काळात संघर्ष करणा-या आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहनही करीत आहे.