Published On : Thu, Mar 28th, 2019

पुलवामा हल्ला प्रकरण : एकाला पुण्यातून अटक

Advertisement

पुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला बिहार एटीएसने अटक केली आहे . ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार , पुलवामा हल्ला प्रकरणी एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे .

Advertisement
Advertisement

आता बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement