
Lamp lightning ceremony for the inaugaration of social security schems PMBSY,PMJJBY & APY at the hands of Union Minister for Road Transport, Highway and Shipping Sh, Nitin Gadakari while Member of Legisaltive Council Sh. Anil Sole , Divisional Commisioner of Nagpur Sh. Anup Kumar, District Collector Sh. Abhishek Krishna, & other dignitaries looks on.
नागपूर। सामाजातील गरीब, वंचित, घटक तसेच मध्यमवर्गीय लोकांना नव्याने प्रारंभ झालेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व अटल पेंशन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल तसेच बैंकीग समावेशन प्रक्रियेमध्ये या घटकांना सामाविष्ट करुन घेता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जन्मलेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेचा दूसरा टप्पा असलेल्या या सामाजिक सुरक्षा योजनांचा प्रारंभ कोलकत्ता मध्ये आज ९ में रोजी झाला आणि त्याचवेळेस या योजनांचे उद् घाटन देशभरातील ११५ ठिकाणी करण्यात आले. नागपूर मध्ये केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व जहाज बांधणी मंत्री श्री नितीन गडकरी यांचा हस्ते या योजनांचा शुभारंभ डाँ. बसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला.
सामाजिक सुरक्षा क्षेत्रातील ह्या योजना खूपच किफायतशीर असून या योजनांचा लाभ सामाजतील सर्व घटकांना होऊन वित्तीय समावेशनाचा मुख्य उद्देश्य पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . शेतकरी, शेतमजूरांना त्यांच्या हक्काचे पैसे बैकिंगव्यवहाराद्वारे मिळण्याची प्रक्रिया ई- प्रशासनामूळे सोपी झाली असून त्यामूळे सरकारी यंत्रणा वर पडणारा ताण कमी झाला आहे व या प्रक्रियामध्ये पारदर्शकता आली आहे. असे त्यांनी नमूद केले.
Audience present at the inaugral event of social security schems PMBSY,PMJJBY & APY at the hands of Union Minister for Road Transport, Highway and Shipping Sh, Nitin Gadakari.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेनुसार १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत खातेधारकांना वार्षिक १२ रुपये प्रीमियम भरुन एक वर्षाचा दोन लाखापर्यंतचा अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी विमा कवच मिलू शकते, तर पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजना या योजनेमुले १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत खातेधारकांना वर्षिक ३३० रुपये भरुन लाभार्थ्र्यांना २ लाखापर्यंत जीवन विमा लाभ मिळणार आहे.
अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रासाठी ज्येष्ठ नाकरिकांच्या आर्थिक सुरक्षा गरजा पूर्ण होणार आहे.
अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी अर्थ संकल्पात तरतूद केलेल्या या योजनांचा आज शुभारंभ झाला याचा मला आनंद होत आहे असेही गडकरी म्हणाले. गाव, गरीब, किसान या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या घटकांना बैंकांनी वित्तपुरवठा व स्वयंरोजगार योग्य रितीने मिळण्यासाठी बैंकानी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. नागपूर जिल्हयामध्ये पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत १ लक्ष ९५ हजार बैंक खाती उघडल्या गेली याचे श्रेय बैंक कर्मचा-यांना जाते असे गौरवोद् -गार त्यांनी काढले.
Union Minister for Road Transport, Highway and Shipping Sh, Nitin Gadakari delivering key note address at the inaugral event of social security schems PMBSY,PMJJBY & APY while General Manager Of Bank Of India Head Office Sh. Gopal Bhagat, Nagpur Mucipal Commisioner Shrawan Hardikar, Member of Legisaltive Council Sh. Anil Sole , Nagpur’s Mayor Sh. Pravin Datke , Divisional Commisioner of Nagpur Sh. Anup Kumar, District Collector Sh. Abhishek Krishna, & other dignitaries looks on.
यावेली विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आधूनिक बैंकींग पासून वंचित राहलेल्या गरीब लोकांना या योजनांव्दारे सक्षम होता येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या लाभार्थ्यांना विमाप्रमाणपत्र नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार अनिल सोले, विभागीय आयुक्त अनूप कुमार , बैंक आँफ इंडियाचे महाप्रबंधक गोपाल भगत, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकातामधील भाषणाचे थेट प्रक्षेपण सभागृहात दाखविण्यात आले. कार्यक्रमास मोठया संख्येने जन समुदाय व बैंक कर्मचारी उपस्थित होते.
One of the beneficiary of PMBSY ( Pradhan Mantri Bima Suraksha Yojana) receiving Insurance-Certificate from Union Minister for Road Transport, Highway and Shipping Sh, Nitin Gadakari.
Live telecast of speech of Prime Minister Narendra Modi for lauching of PMBSY,PMJJBY & APY at Kolkata being shown at Dr, Vasantrao Deshpane Hall, Nagpur.
Live telecast of speech of Prime Minister Narendra Modi for lauching of PMBSY,PMJJBY & APY at Kolkata being shown at Dr, Vasantrao Deshpane Hall, Nagpur.