Published On : Mon, May 9th, 2022

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नवी दिल्लीकडे प्रयाण

Advertisement

नागपूर : मिहान परिसरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा आटोपून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी. दुपारी ४.१५ वाजता नवी दिल्लीकडे प्रयाण केले.

विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितिन राऊत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, एअर मार्शल शशीकर चौधरी, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

राज्यपाल मुंबईला रवाना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आजच्या दौऱ्यानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेही काल सायंकाळी नागपूर येथे आगमन झाले होते. दुपारी ४.४५ ला विशेष विमानाने राज्यपाल मुंबईकडे रवाना झाले.

विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठी उर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितिन राऊत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement