Published On : Wed, Nov 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रातील बीडमध्ये मतदानाला गालबोट,’या’ मतदान केंद्रावर झाला राडा, EVM ची केली तोडफोड

Advertisement

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली आहे. बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्यानंतर घाट नांदुर गावात ईव्हीएम मशीन तोडफोड करण्यात आली.

हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन फोडले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे. 3 बूथवर फोड तोडफोड झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचे समोर आले. बन्सी शिरसाट या कार्यकर्त्याची गाडी सुद्धा फोडली आहे.

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज सकाळी याच मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

बीडच्या परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती. यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदारसंघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते. मात्र माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली यानंतर मतदारसंघात मोठा राडा घडला.

Advertisement

या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नांदुरघाट मधील तीन आणि चोथेवाडी आणि मुरंबी गावात देखील मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांनी दिली. तसंच परिस्थिती नियंत्रणात असून धुडगूस घालणाऱ्यांना अटक केली जाईल, असे देखील सांगितले.

Advertisement
Gujarat Police की हिरासत से आरोपी फरार! #CrimeNews #PoliceCustody #AccusedEscapes #CCTV #ViralNews

Gujarat Police की हिरासत से आरोपी फरार! #CrimeNews #PoliceCustody #AccusedEscapes #CCTV #ViralNews

Nagpur Urs Procession: नोट उड़ाना पड़ा भारी! #NagpurNews  #BabaTajuddin #Urs #FIR #crimenews

Nagpur Urs Procession: नोट उड़ाना पड़ा भारी! #NagpurNews #BabaTajuddin #Urs #FIR #crimenews

Nagpur ATM Loot: 1 घंटे में 2 ATM पर हमला! #nagpurnews  #ATMRobbery #Crime #GasCutterGang #CCTV

Nagpur ATM Loot: 1 घंटे में 2 ATM पर हमला! #nagpurnews #ATMRobbery...

Amravati Murder Case: प्रेम प्रसंग में युवक की बेरहमी से हत्या #amravati  #MurderCase #LoveAffair

Amravati Murder Case: प्रेम प्रसंग में युवक की बेरहमी से हत्या #amravati...

Nagpur में चाकू की नोक पर लूट! #NagpurNews #BreakingNews #CrimeNews #Loot #Robbery #KnifeAttack

Nagpur में चाकू की नोक पर लूट! #NagpurNews #BreakingNews #CrimeNews #Loot #Robbery...

Jammu से भागकर Nagpur पहुंचे प्रेमी युगल! #NagpurNews #JammuNews #LoveStory #MissingCase #newsupdate

Jammu से भागकर Nagpur पहुंचे प्रेमी युगल! #NagpurNews #JammuNews #LoveStory #MissingCase #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges