Published On : Fri, Dec 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अमित शाहांचे पाप लपवण्यासाठी भाजपकडून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा घाट; नाना पटोले यांचा हल्लाबोल

Advertisement

नागपूर : गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले.

अमित शाहांचे हे पाप झाकण्यासाठी भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात कुभांड रचून फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशाच्या एकतेसाठी काँग्रेस पक्षाचे दोन महत्वाचे नेते शहीद झाले. भाजपाने देश अदानीला विकण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. सरकार अदानीला वाचवण्यासाठी नौटंकी करत आहे. मोदी अदानींचे काय संबध आहेत ते जगजाहीर आहे.

काँग्रेसने अदानी प्रश्नावर चर्चेची मागणी केल्याने सत्ताधारी भाजपाकडून खोट्या कथा रचून राहुल गांधी व काँग्रेस पक्षाला बदनाम केले जात आहे. राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी किती घाबरतात हे यावरून स्पष्ट होत, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Advertisement
Advertisement