Advertisement
पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील राजभवन परिसरातील उद्यानामध्ये मा. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात केले. यावेळी सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव रणजित कुमार, परिवार प्रबंधक वसंत साळुंके, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आदी उपस्थित होते.
विधान भवन येथील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास मा. राज्यपाल चे. विद्यासागर राव राजभवन येथे दाखल झाले. येथील उद्यानामध्ये त्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी त्यांनी उद्यानात राबविण्यात येणाऱ्या मधुमक्षिका पालन उपक्रमाची माहिती घेतली. मधुमक्षिका पालन करण्याचे प्रात्यक्षिकही यावेळी झाले. यावेळी विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement