Published On : Thu, Aug 13th, 2020

गोकुळाष्टमी उत्सवावर कोरोणाचे सावट परंतु भविकामध्ये उत्साह कायम

रामटेेक: कोरोनाविषाणूच्या संकटामुळे यावर्षी प्रत्येक उत्सवावर मर्यादा आलेल्या आहेत. नागरिकांनी या उत्सवाला घरगुती स्वरूप दिले आहे तर अनेकांनी यावर्षी हा उत्सव साधेपणाने साजरा केला भविकामध्ये उत्साह कायम असल्याचे निदर्षनास आलें.मनोभावें मोठया उत्साहाने श्रीेकृष्णा जन्माष्टमी हा ” कोरोनाचे विघ्न दूर कर रे बाबा” अशी प्रार्थना देखिल भविकानी श्रीेकृष्णा सामोर केली.

दह्यात साखर आणि, साखरेत भात,दरवर्षी शहारा शहरात विविध ठिकाणी सामूहिक दही हंडी चे कार्यक्रम असतात.. तरुणांपासून ते बच्चे कंपनी सुद्धा या दही हंडी कार्यक्रमात सहभागी होतात.

परंतु यावर्षी कोरोणाचे प्रादुर्भाव असल्याने सर्व उत्साहावर पाणी फेरल्या गेले असल्याचे भाविकांचा हिरमुड झाला.
, सोशल डीस्टसिंग चे पालन केले , चेहऱ्यावर मास्क लावले विसर्जन दरम्यान येताना दोनच व्यक्तिना प्रवेष करून नियमाचे सर्व भाविकांनी पालन केलं. नगर परिषद व पोलीस स्टेशन रामटेक चे पोलीस निरिक्षक दिलिप ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त होता. काहींनी गर्दित जाण्याचे टाळले घरीच टपात विसर्जन केलं.