Published On : Fri, Aug 23rd, 2019

समाज भावनाच्या लोकापर्ण हो०याच्या पुर्वीच नविन टाईल्स दोन महिन्यांच्या आत उखडल्या। उदघाटन होण्या पुर्वीच उखाल्या टाईल्स

Advertisement

पाराशिवनी : – पाराशिवनी तालुकातील कन्हान। ची र्नगरपरिषद अंतर्गत हनुमान नगर प्रभाग क्र २ येथील समाज भवनाचे सौदर्यीकरणाकरिता समाज भवनाच्या दर्शनी भागात नविन टाईल्स लावुन दोन महिन्यातच नवीन टाईल्स उखडुन तुटल्यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवंते वर प्रश्नचिन्ह लावल्या जात आहे.

हनुमान नगर कन्हान येथील समाज भवनाचे सौदर्यीकरण्याचे काम नगर परिषद कन्हान-पिपरी व्दारे खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले त्यानी दुसऱ्या ठेकेदाराला पेटी कानक्टर ला दिला असुन नगर परिषदेच्या देखरेखीत सुरू आहे. समाज भवनाच्या दर्शनी भागात नवीन टाईल्स लावण्यात आली परंतु दोन महिने होत नाही तर टाईल्स उखडुन तुटुन पडल्याने दर्शनी भाग अशोभनिय दिसत आहे. तसेच बाथरूम व शौचालयातील टाईल्स सुध्दा उखडुन तुटल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने कंत्राटदार व संबंधित विभागाच्या संगनमताने तर होत नाही ना अशी नागरिकात चर्चा रंगत आहे.

सार्वजनिक समाज भवनाच्या सौदर्यी करणाच्या बांधकामात जर कंत्राटदारा कडुन व नगरपरिषदे व्दारे निष्काळजी पणाचे धोरण असेल तर समाज भवना च्या नविनकरणाची इमारत किती दिवस टिकेल असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. यामुळे आतापर्यंत झालेल्या नविन बांधकामाची चौकसी करून संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करून व्यवस्थित चांगल्या दर्जाचे टिकावु बांधकाम करण्याची मागणी प्रभागातील नगरवाशीयांनी केली आहे.

कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत शहराच्या मधोमध एकमेव सार्वजनिक समाज भवन असल्याने त्याचा लोकापर्ण उदघाटन ची तैयारी चालु असुन था समाज भवनला नागरिकांचे शासकीय, शैक्षणिक,धार्मिक, सामाजिक , राजकीय व वैयक्तिक कार्यक्रम, शिबीर, समारंभ येथे आयोजित करण्यात येत आहे. यास्तव येथे पिण्याच्या पाण्या करिता नळाची, पाणी टाकीची, साफ सफाईची व नियमित एका चौकीदाराची व्यवस्था करण्यात यावी. जेणे करून या समाज भवनाची सुंदर देखभाल व्यव स्थित होऊन शहरवाशी यांना समाज भवनाचा लाभ घेता येईल. कमल यादव प्रतिनि्धी