| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 18th, 2020

  मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट… राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

  चीनला ‘लाल डोळे’ दाखवा अन्यथा ‘चिनी खुळखुळे’ वाजवत बसा… राष्ट्रवादी युवकचे अनोखे आंदोलन…

  मुंबई – चीनने केलेल्या हल्ल्यात आपले जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चिनी खुळखुळे’ भेट पाठवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

  चीन सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्यामध्ये आपले जवान शहीद होत आहेत परंतु केंद्रसरकार यावर ठोस पावले उचलताना दिसत नाही.
  पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी लहानसहान गोष्टीवर ट्वीट करत असतात मात्र चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय मोदींनी यासंदर्भात ठोस पावलेही उचललेली नाही. त्यामुळे आता मोदींनी चीनला ‘लाल डोळे’ दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही त्यांना ‘लाल डोळे’ दाखवा पुर्ण देश तुमच्या सोबत आहे असे मेहबूब शेख यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे.

  दरम्यान चीनच्या हल्ल्यानंतर कोणतीच भूमिका न घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनच्या वस्तूमधील ‘खुळखुळा’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भेट म्हणुन पाठवून केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145