Published On : Mon, Aug 16th, 2021

नालंदा नगर जलकुंभ शटडाऊन ऑगस्ट १७ ला तर रेशीमबाग जलकुंभ शटडाऊन १८ ला

Advertisement

नालंदा नगर जलकुंभ परिसर पाणी पुरवठा १७ ऑगस्ट (मंगळवार) आणि रेशीमबाग जलकुंभ (बुधवार) १८ ऑगस्ट रोजी बाधित राहणार

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नालंदा नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन) आणि रेशीम बाग जलकुंभ (धंतोली झोन ) येथे फ्लोव मीटर लावण्यासाठी १२ तासांचे शटडाऊन अनुक्रमे १७ ऑगस्ट (मंगळवार) आणि १८ ऑगस्ट (बुधवार ) रोजी घेण्याचे ठरविले आहे.

या शटडाऊन दरम्यान नालंदा नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन) आणि रेशीम बाग जलकुंभ (धंतोली झोन ) येथील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे तसेच ह्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा ही शक्य होणार नसल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे असे आवाहन मनपा-OCWने केले आहे.

या शटडाऊनमुळे मंगळवारी (१७ ऑगस्ट ) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

नालंदा नगर जलकुंभ : बाबुलखेड, पार्वती नगर , रामेश्वरी रोड , भगवान नगर , नानार्जी ले आउट , चंद्र नगर, मित्र नगर, बालाजी नगर, नाईक नगर , ज्ञानेश्वर नगर,

तसेच या शटडाऊनमुळे बुधवारी (१८ ऑगस्ट ) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

रेशीम बाग जलकुंभ: जुनी शुक्रवारी, गणेशनगर, महावीरनगर, गणेशनगर, जुने आणि नवीन नंदनवन , आनंद नगर, शिव नगर, नेहरू नगर, सुदामपुरी, मिरे ले आउट, बंद गाली, सक्करदरा पोलीस स्टेशन चा भाग

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठा ही शक्य होणार नसल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे असे आवाहन मनपा-OCWने केले आहे.

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.