Published On : Mon, Mar 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबुक अकाउंट हॅक; अश्लिल पोस्ट प्रसारित झाल्याने चिंतेत!

पत्रकार परिषदेत अश्रू अनावर,सायबर पोलिसातही केली तक्रार
Advertisement

नागपूर: सातासमुद्रा पार पाककलेमुळे ख्याती निर्माण करणारे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे.त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. विष्णू यांच्या पाककलेच्या रेसिपी अगदी घराघरात पोहचल्या आहेत. मात्र, त्याचे फेसबुकवरील खाते कोणीतरी हॅक केले असून त्याद्वारे अश्लिल पोस्ट प्रसारित होत आहेत.त्यामुळे त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी या संदर्भात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मात्र तरीही आरोपीचा शोध लागला नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. विष्णू यांचे ‘मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर’ या फेसबुक अकाऊंटला कोणीतर हॅक करून त्यावर आता अश्लील पोस्ट केल्या जात असल्याचे धक्कादायक कृत्य उघडकीस आले आहे. या संदर्भात विष्णू मनोहर यांनी सायबर पोलिसांना तक्रार सुद्धा केली आहे.मात्र दहा ते बारा दिवस लोटूनही अद्यापही आरोपी सापडला नाही.

या संदर्भात त्यांनी नागपूर, बंगळुरु, मुंबई, पुणे, तसेच अमेरिकेमध्ये त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात मेटा सोबतही संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत अकाऊंट रिकव्हर होऊ शकले नाही असे ते म्हणाले. अकाऊंट हॅक झाल्याने फॉलोवरची संख्या घटत चालली आहे. त्या पेजला अनेकजण सोडून जात आहे शिवाय अनेक लोक विष्णू मनोहर यांना फोनद्वारे आणि मेसेजद्वारे संदेश पोहोचवत आहे अशा पद्धतीचे अश्लील पोस्ट का करतात असे प्रश्न आपल्याला विचारत आहेत असे शेफ विष्णू मनोहर यांनी म्हटले आहे. या लिंकवर क्लिक केल्यास युजर्सचे अकाऊंट हॅक होऊ शकते.त्यामुळे या अकाऊंटच्या लिंकला चुकूनही क्लिक करू नये असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.
भर पत्रकार परिषदेत विष्णू यांना अश्रू अनावर –

विष्णू मनोहर यांचे अकाउंट हॅक झाल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेला बसलेला धक्का आणि चाहत्यांचा होणारा गैरसमज यामुळे विष्णू मनोहर अस्वस्थ झाले आहेत. हॅकरचा शोध लागत नसल्यामुळे अखेर विष्णू मनोहर यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी विष्णू मनोहर यांना अश्रू अनावर झाले. सरकारने या हॅकरचा शोध घेऊन त्याला धडा शिकवावा, अशी मागणी विष्णू मनोहर यांनी केली आहे. तसेच चाहत्यांनी माझ्यावरचा विश्वास कायम ठेवावा, असं विष्णू मनोहर यांनी आवाहन केलं आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.