Published On : Sat, Nov 27th, 2021

नागपूर पोलिसांचा हवाला व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक, 84 लाखांची रोकड जप्त

नागपूर : नागपूर पोलिसांनी हवाला व्यवसाय (hawala traders) करणाऱ्या विरोधात सर्जिकल स्ट्राइक केला आहे. काल रात्री इतवारी परिसरात हवाला व्यापाऱ्यांवर मारलेल्या धाडीत 84 लाखांची रोकड जप्त केली आहे. भुतडा चेंबर या इमारतीत पोलिसांना मोठ्या संख्येने खाजगी लॉकर्स आढळले असून त्यापैकी काही लॉकर उघडल्यानंतर ही 84 लाखांची रोकड हस्तगत झाली आहे. मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लॉकर असून ते पोलिसांनी सील केले आहे. त्यामधूनही हवाला व्यापाराची रोकड निघण्याची शक्यता आहे. या कारवाईनं नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसून आणखी जास्त रक्कम हस्तगत होऊ शकते असा अंदाज आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement