Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर गुन्हे शाखेकडून अवैध दारू तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; लाखोंची परदेशी दारू जप्त

Advertisement

नागपूर: गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने मंगळवार, 28 जानेवारी रोजी जरीपटका येथील साई मंदिर चौकाजवळ परदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी टाटा पंच वाहन आणि 6,53,280 किमतीची परदेशी दारू जप्त केली.

करवाई दरम्यान पोलिसांनी टाटा पंच (MH-32-AS-9985) अडवली. चालक आणि प्रवाशाला ताब्यात घेतले. त्यांची ओळख अमर अशोकराव सुनके (33) रा. हिंगणघाट, वर्धा आणि राकेश शंकरसिंग चंदेल (25) रा. हिंगणघाट, वर्धा अशी आहे.

तपासणी केल्यानंतर, अधिकाऱ्यांना एका बॉक्समध्ये ओसी ब्लूच्या 48 बाटल्या (180मिली) आणि रॉयल स्टॅग व्हिस्कीचे पाच बॉक्स आढळले.ज्यात प्रत्येक बॉक्समध्ये संख्या समान होती.

चौकशीदरम्यान, संशयितांनी सांगितले की त्यांना हिंगणघाट येथील अविनाश नवरखेडे यांनी दरमहा 10,000 रुपयांवर कामावर ठेवले होते. नवरखेडे यांनी त्यांना वाहन पुरवले होते. नागपूरच्या कामठी रोडवरील ओका बार अँड रेस्टॉरंटमधून दारू वाहतूक करण्याचे निर्देश दिले होते.

Advertisement

जप्त केलेल्या वस्तूंमध्ये दारूचे सहा बॉक्स आणि वाहन यांचा समावेश आहे, त्यांची किंमत 6.53 लाख रुपये आहे. पोलिसांनी संशयित अविनाश नवरखेडे आणि ओका बार अँड रेस्टॉरंटचे मालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पुढील चौकशीसाठी हे प्रकरण जरीपटका पोलिस ठाण्यात हस्तांतरीत करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी आणि पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक मुकुंद ठाकरे, उपनिरीक्षक नवनाथ देवकाते आणि ईश्वर खोराडे, मुकेश राऊत, अमोल जासूद आणि अनुप तायवाडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मिळून ही करवाई केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.