Published On : Wed, Sep 30th, 2020

माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ जनजागृती रथाला हिरवी झेंडी

Advertisement

नागपूर: केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आणि आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलेकार उपस्थित होते.

या पथकाव्दारे जिल्हाभर फिरून नागरिकांची जनजागृती करण्यात येणार आहे. ‘कोरोनावर मात करण्यासाठी कधीच विसरू नका एसएमएस’ या घोषवाक्याद्वारे ही मोहीम राबविली जात आहे. एसएमएस म्हणजे सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, आणि सँनिटायझरने वेळोवेळी हात धुवा या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

या मोहिमेच्या माध्यमातून नागपूरमधील कोविड- 19 संबंधी महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर पोहचविण्यात येत आहेत. त्यामध्ये कोरोना हेल्पलाइन 18002333764, नागपूर मनपा हेल्पलाइन 0712-2567021 /2551866, कोरोना डेस्क 91-11-23978046, बेड उपलब्धता 0712-2545473 /2532474 आणि बिल तक्रार 9607601133 नागरिक कोरोनाबाधितांवर वेळेत निदान व उपचार आणि बिलासंदर्भातील तक्रारीसाठी संपर्क साधू शकणार आहेत.

‘बदलू या आपला व्यवहार मिळून करु करोनावर वार’, ‘कृपया शासनाच्या आरोग्य पथकास आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची खरी माहिती द्या’, ‘आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाला सहकार्य करा’, आणि कोविड-19 आक्रमण करण्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जात, पंथ, सीमा किंवा भाषा बघत नाही, म्हणून आपण एकत्र मिळून या महामारीविरुद्ध लढा देऊ या ! आदि घोषवाक्यांव्दारे नागरिकांमध्ये जनजागृती पथक करणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.