Published On : Fri, Dec 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात हत्याचे सत्र सुरूच; डोक्यात दांडक्याने वार करून युवकाची हत्या

Advertisement

नागपूर : शहरातील कळमना पोलीस ठाण्यांतर्गत एका सराईत गुन्हेगाराची लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. प्रत्यक्षात हा गुन्हेगार काही दिवसांपासून आरोपीच्या वहिनीचा सतत पाठलाग करून तिला जबरदस्तीने त्रास देत होता. आरोपीने तरुणाला असे करण्यापासून रोखल्याने त्यांच्यात वाद झाला, या वादातून ही घटना घडली. कळमना पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून तपास सूरू केला आहे.

कळमना पोलीस ठाण्यातील आदिवासी प्रकाश नगर येथे २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. राहुल सचिन गुप्ता असे मृतकाचे नाव असून त्याची हत्या राजा अश्पाक शेख या तरुणाने केली होती. वास्तविक, राहुल गुप्ता हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर चोरी, मारहाण यासारखे 11 गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपासून राहुल अश्पाकच्या वहिनीचा बळजबरीने पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्यामुळे राजा अशफाक याने त्याला समजावण्यासाठी आदिवासी प्रकाश नगर येथील मंदिरामागे भेटण्यासाठी बोलावले होते.

यावेळी त्यांच्यात आपापसात भांडण झाले आणि या भांडणात राजाने राहुलच्या डोक्यावर शेजारी पडलेल्या लाकडाच्या दांड्याने वार करून जखमी केले. या घटनेनंतर राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला. लोकांनी ही माहिती राहुलची आई विद्या गुप्ता यांना फोनवर दिली, त्यानंतर राहुलची आई घटनास्थळी पोहोचली आणि जखमी अवस्थेत त्याला घरी घेऊन गेली. त्याच्या आईनेही त्याला वैद्यकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले मात्र त्याने उपचार घेण्यास नकार दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी 25 डिसेंबरला राहुलच्या आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्धावस्थेत दिसला. त्यानंतर त्याला तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी राजा अश्पाक शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.