| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 15th, 2019

  महावितरणमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी

  नागपूर: महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

  काटोल रोडवरील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुंबई मुख्यालयातील संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली.

  यावेळी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, अधिक्षक अभियंता नारायण आमझरे, हरिष गजबे,सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे आदी सह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145