महारॅलीत सहभागी व्हा…. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवा..!
नुकताच बारावीचा निकाल घोषित झाला. काही दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होणार. विद्यार्थ्यांच्या करिअरचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरणाऱ्या या निकालांची सर्वांनाच उत्सुकता असते. मात्र, निकालाच्या काळात काही पालकांकडून तसेच इतर माध्यमांद्वारे अनावश्यक दडपण आणले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी निराश होऊन भयभीत होतात. होतकरू आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना आपली क्षमता सिद्ध करता येत नाही. काही पालक विद्यार्थ्यांना समजून घेण्यात अपयशी ठरल्यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडतात. या सामाजिक समस्येबाबत समाजात जागरूकता वाढविणे गरजेचे आहे.
परीक्षेतील गुणांवरून यश-अपयश ठरवू नये, परीक्षाकाळात तसेच निकालानंतर पालकांची भूमिका काय असावी, विद्यार्थ्यांचे भावविश्व कसे समजून घ्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय करिअर साप्ताहिक आणि स्वयम् सामाजिक संस्थेच्या वतीने ‘मिशन-जीने दो’ महारॅलीचे आयोजन केले आहे. या समाजशील उपक्रमात अनेक शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला असून, आपणही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
तुमचे एक सकारात्मक पाऊल, जे देईल भावी पिढीला नवी ऊर्जा…
महारॅलीचा दिनांक : रविवार, ४ जून २०१७
वेळ : सकाळी ८ वाजता
महारॅलीचा मार्ग : सुरुवात : संविधान चौक – व्हेरायटी चौक – झाशी राणी चौक – विद्यापीठ ग्रंथालय चौक – अलंकार टॉकीज चौक – अजित बेकरी टी पॉइंट – चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क (धरमपेठ) येथे समारोप.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९०४९७६३८४९, ०७१२-२७५०७९५