Published On : Sun, Nov 10th, 2019

पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते कोराडी मंदिरात महापूजा

Advertisement

छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रम संपन्न गीताबाई शर्मातर्फे मंदिराला 1 लाख देणगी

नागपूर: श्री महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर कोराडी येथे आज कार्तिक महिन्यातील छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

यादरम्यान नागपूरच्या गीताबाई बन्सीलाल शर्मा यांच्याकडून मंदिराला 1 लाख रुपये देणगी देण्यात आली. देणगीच्या रकमेचा धनादेश पालकमंत्री बावनकुळे यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर त्यांनी तो धनादेश मंदिराच्या व्यवस्थापनकडे सुपूर्द केला.

या महापूजेला ज्योतीताई बावनकुळे, संकेत बावनकुळे, मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा, सचिव केशवराव फुलझेले, विश्वस्त दयाराम तडसकर, प्रेमलाल पटेल, अजय विजयवर्गी, नंदू बजाज उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते महापूजा आणि आरती यावेळी करण्यात आली.

Advertisement

कार्तिक महिन्यात देवीला 56 प्रकारच्या पक्वान्नांचा नैवेद्य देण्यात येतो. त्यालाच छप्पनभोग अन्नकूट म्हणतात. दरवर्षी याच महिन्यात हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. आज सुमारे 3-4 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.