Published On : Thu, Oct 28th, 2021

सभागृह नेता देवानंद वाढई यांनी स्वीकारला पदभार

चंद्रपूर/ प्रतिनिधी : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृह नेता पदी भाजपचे नगरसेवक देवानंद वाढई यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा कारभार बुधवारी (ता. २७) स्वीकारला. यावेळी कक्षात आसनस्थ झाल्यानंतर उपस्थितांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Advertisement

मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, प्रकाश धारणे, गटनेता जयश्री जुमडे, ब्रिजभूषण पाझारे यांनी नवनियुक्त सभागृह नेता देवानंद वाढई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement