Published On : Thu, May 13th, 2021

क्षीरसागर यांचा उत्कुष्टकार्याबद्दल सत्कार

Advertisement

– मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ व्दारे शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन ला १ महिना १२ दिवसात परीवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर हयांनी कन्हान पोलीस थानेदार म्हणुन कोरोना बिकट संकट काळात परिसरात उत्कुष्ट कार्य करित शांती सुव्यवस्था प्रस्थापित केल्याबद्दल मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार कन्हान व्दारे मा. सुजित कुमार क्षीरसागर साहेबाना छत्रपती शिवाजी महाराजां ची प्रतिमा देऊन सत्कार करून कर्तव्यदक्ष भावीकार्यास शिवशुभेच्छा देण्यात आल्या.

Gold Rate
Apr 22 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,700 /-
Silver/Kg ₹ 2,51,000/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान पोलीस स्टेशन येथे १ एप्रिल २०२१ ला ला परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक मा सुजितकुमार क्षीरसागर हयांनी कन्हान थानेदार म्हणुन पदभार सांभाळुन परिसरातील रेती, कोळसा चोरी व इतर अवैद्य धंद्यावर अंकुश लावुन कोरोना बिकट काळात दररोज विविध कार्यवाई करून गुन्हेगारांना पकडुन गुन्हे दाखल केल्याने अवघ्या १ महिना १२ दिवसात कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात उत्कृष्ट कार्य करित शांती सुव्यवस्था प्रस्थापित करित काटोल पोलीस स्टेशनला कर्तव्यावर प्रस्थान करित असल्याने बुधवार (दि.१२) मे २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन येथे सायंकाळी मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे परीवेक्षाधिन पो. उप अधिक्षक मा. सुजितकुमार क्षीरसागर साहेबाना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करून भावी जिवनात व पोलीस विभागात प्रामाणिक पणे उत्कुष्ट कर्तव्यदक्ष कार्य करून उन्नती करण्याकरिता मराठा सेवा संघ कन्हानचे शांताराम जळते, ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कमल सिंह यादव, सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर आदीने शिवशुभेच्छा दिल्या.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement