Published On : Sat, Jun 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 20 लाखांहून अधिक किमतीच्या दागिन्यांची चोरी; महिला प्रवाशाचे पर्स लंपास

Advertisement

नागपूर : देशातील अत्याधुनिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तब्बल 20 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ऐवजाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजनी रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाचे पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील अंजली अजय मुधाळकर (वय 67) या 10 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस (क्रमांक 26102) च्या सी-4 डब्यातील सीट क्रमांक 29 वरून प्रवास करत होत्या. त्या अजनी रेल्वे स्थानकावरून पुण्यासाठी गाडीत चढल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेत ठेवलेले पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

Gold Rate
Aug 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,900 /-
Gold 22 KT ₹ 1,42,800 /-
Silver/Kg ₹ 2,36,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पर्समध्ये 8 हजार रुपये रोख रक्कम, ओळखपत्रे, सोन्याचे टॉप्स, नेकलेस, सोन्याची चेन, डायमंड पेंडंट, सोन्याचे मंगळसूत्र तसेच इतर मौल्यवान दागिने होते. चोरी गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे 20 लाख 75 हजार 500 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. वंदे भारतसारख्या हाय-प्रोफाईल रेल्वेगाडीत लाखो रुपयांच्या चोरीची घटना समोर आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि शासकीय रेल्वे पोलीस (GRP) यंत्रणा सतर्क झाली.

Advertisement

गाडी वर्धा स्थानकावर पोहोचल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी महिलेची चौकशी करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर जीआरपीकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानके आणि गाडीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती जीआरपीकडून देण्यात आली आहे.

प्रवाशांना पोलिसांचे आवाहन –
रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना प्रवासादरम्यान आपले मौल्यवान सामान, दागिने आणि बॅग यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ आरपीएफ किंवा जीआरपीशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news  #nagpurnews

SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news...

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews #crimenews #accusedarrested

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews...

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges