Published On : Tue, Sep 25th, 2018

पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Advertisement

एकात्म मानव दर्शनचे प्रणेते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक व थोर विचारवंत पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेचे छत्रपती ‍ शिवाजी महाराज, नवीन प्रशासकीय इमारतीतील तैलचित्राला महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन नागपूर नगरीच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

यावेळी अति. आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, सहा. जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, सा.प्र. विभागाचे डी.जी. भडंग, कमलेश झंझाड आदी उपस्थित होते.